India vs Australia 4th test live score updates : अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तासाभरात चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय.. नाणेफेक जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथने लगेच फलंदाजी करणार असल्याचे जाहीर केले. रोहित शर्मालाही प्रथम फलंदाजी करायची होती आणि हे त्यानेही मान्य केले. पहिल्या तीन कसोटींच्या खेळपट्टींसारखी ही खेळपट्टी दिसत नसल्याने दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करून धावांचा डोंगर उभा करण्यासाठी प्रयत्नशील होते अन् त्यात सध्यातरी स्मिथने बाजी मारली. भारताला सहाव्या षटकात विकेट मिळवण्याची संधी मिळाली होती, परंतु यष्टिरक्षक केएस भरतने ( KS Bharat Dropped Catch) झेल सोडला. India vs Australia test series
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी व अखेरची कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जाणार आहे. भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु अहमदाबाद कसोटी भारतासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांना त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानांनी कसोटी कॅप देऊन सन्मानित केले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीची एन्ट्री झाली. ( भारत- ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीचे पूर्ण धावफलक)
सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा ( ७ धावांवर होता ) सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टाकला. हेड व उस्मान ख्वाजा जलदगती गोलंदाजांचा सहज सामना करत होते आणि रोहितने फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीला आणले. पण, त्याचाही या दोघांनी खुबीने सामना केला. ३० मिनिटांची मॅच पाहून पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी स्टेडियम सोडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Umesh Yadav creates a big chance but KS Bharat drops a dolly! Big opportunity missed by India, PM Narendra Modi leaving the stadium after watching the first 30 minutes.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.