Join us  

Ind vs Aus 4th test live: रवींद्र जडेजाने विकेट फेकली, विराट कोहलीची सटकली! समालोचकांनीही टीका केली, Video 

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी चांगली जमली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:12 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी चांगली जमली होती... ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात आज भारतीय संघ धावांचा डोंगर उभा करेल असे चित्र होते. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) विकेट फेकल्याने थोडा घोळ झाला. विराट व केएस भरतने डाव सावरताना लंच ब्रेकपर्यंत ४ बाद ३६२ धावा केल्या आहेत. जडेजाच्या विकेट फेकण्यावर विराटलाही विश्वास बसेनासा झाला होता. Ind vs aus scorecard

श्रेयस अय्यरला हॉस्पिटलची वाट धरावी लागली; अहमदाबादमध्ये मोठी घडामोड

शुबमन गिलच्या ( Shubman Gill Century) शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताकडूनही सडेतोड उत्तर मिळाले आहे. रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर  शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. नॅथन लाएनने त्याला LBW केले. विराट कोहलीने त्यानंतर मोर्चा सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद २८९ धावा केल्या होत्या. India vs Australia test series 

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने विकेट फेकली... विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी सुरू असताना त्याने उस्मान ख्वाजाच्या हातात सोपा झेल दिला. जडेजा ८४ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर जड्डूने चुकीचा फटका मारला. यापूर्वी असाच फटका मारला होता अन् त्यावर तो वाचला होता. पण, त्याने ती चूक पुन्हा केली अन् विकेट गमावली.  Ind vs aus 4th test match live score

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाविराट कोहली
Open in App