Join us  

Ind vs Aus 4th test live: विराट कोहलीचे द्विशतक हुकले, ९ विकेट पडूनही टीम इंडियाला पहिला डाव गुंडाळावा लागला, जाणून घ्या कारण

India vs Australia 4th test live score updates : ३ वर्ष व ३ महिन्यांनी विराट कोहलीने ( Virat Kohli Century)कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 4:35 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : ३ वर्ष व ३ महिन्यांनी विराट कोहलीने ( Virat Kohli Century)कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. कसोटीतील ते त्याचे २८वे आणि ७५वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. विराटच्या या विक्रमी शतकाला अक्षर पटेलची ( Axar Patel) दमदार साथ मिळाली. विराट व अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी करताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. श्रेयस अय्यर कंबरेच्या दुखण्यामुळे फलंदाजीला उतरू शकला नाही.

विराट कोहलीला थांबवणे अशक्य...लवकरच सचिनच्या विक्रमाची बरोबरी; पाहा 75 शतकांची लिस्ट

रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह ( ४२) दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने ( २८) विकेट फेकली. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या. विराट व केएस भारत ( ४४) यांनी ८४ धावांची भागीदारी केली. २२ नोव्हेंबर २०१९ नंतर विराट कोहलीने कसोटीत शतक पूर्ण केले. त्याने शतकानंतर गळ्यातील लॉकेट काढले अन् त्याला किस करत सेलिब्रेशन केले. अक्षर पटेल व विराट यांनीही सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून इतिहास घडविला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांनी ५०+ धावांची भागीदारी केली.  

ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दमले होते आणि भारतीय फलंदाज त्यांना अधिक त्रास देताना दिसले. विराट व अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी २१५ चेंडूंत १६२ धावांची भागीदारी केली. अक्षर ११३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांवर मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. विराटने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर आलेला आर अश्विनही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर झेलबाद झाला. उमेश यादवही शून्यावर रन आऊट झाला. विराटच्या द्विशतकाची प्रतीक्षा असताना श्रेयस अय्यर अजूनही मैदानावर येत नसल्याने चाहत्यांची चिंता वाढली होती. 

आता विराटच्या सोबतीला मोहम्मद शमीच होता. १८५ धावांवर विराट कोहलीचा पीटर हँड्सकोम्बने झेल सोडला. स्टीव्ह स्मिथने सर्व खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या बाहेर उभे करून विराटला चौकार मारण्यापासून रोखले. त्यामुळे विराटला हवेत फटके मारावे लागले आणि विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअक्षर पटेलश्रेयस अय्यर
Open in App