Join us  

Ind vs Aus 4th test live: मै होता तो जरूर Out होता! विराट कोहलीने Live मॅचमध्ये अम्पायर नितीन मेनन यांना सुनावलं, Video 

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर आहे. पण, आता या निकालाला फार अर्थ राहणार नाही,

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:55 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित होण्याच्या मार्गावर आहे. पण, आता या निकालाला फार अर्थ राहणार नाही, कारण भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) स्थान पक्के केले आहे. पण, या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli vs Nitin Menon) व नितीन मेनन यांच्यात चांगली जुंपलेली पाहायला मिळाली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडसाठी जोरदार अपील झाले अन् अम्पायर मेनन यांनी त्याला नाबाद दिले. भारताने DRS घेतला अन् त्यानंतर समोर आलेला निकालानंतर विराटने अम्पायरची फिरकी घेतली.  ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराटने अक्षर पटेलसह ( Axar Patel) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. विराट ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी,  रोहित शर्मा ( ३५), चेतेश्वर पुजारा ( ४२), रवींद्र जडेजा ( २८), केएस भरत ( ४४) यांनी चांगली खेळी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. भारताच्या पहिल्या सहा विकेट्सने प्रत्येकी ५०+ धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांनी ५०+ धावांची भागीदारी केली.    पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला आर अश्विनने पहिली विकेट मिळवून दिली. नाईट वॉचमन म्हणून आलेला मॅथ्यू कुहुनेमन ६ धावांवर LBW झाला. त्याने DRS घेतला असता तर तो वाचला असता. ऑस्ट्रेलियाला १४ धावांवर पहिला धक्का बसला. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने १ बाद ७३ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड ४५ आणि मार्नस लाबुशेन २२ धावांवर खेळत होते. हेड अश्विनच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासासून चुकला अन् अपील झाले. भारताने DRS घेतला आणि त्यात अम्पायर्स कॉल दिला गेला. त्यामुळे हेड नाबाद ठरला. त्यानंतर विराटने मस्करी केली. तो म्हणाला, मी असतो तर आऊट दिलं असतं ना. त्यावर मेनन हसले.    

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली
Open in App