Join us  

Ind vs Aus 4th test live : दोन भन्नाट चेंडू, ऑसी फलंदाजांचे उडाले 'दांडू'! मोहम्मद शमीने भारताला मिळवून दिल्या विकेट्स, Video 

India vs Australia 4th test live score updates : आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) दोन भन्नाट चेंडूंवर ऑसी फलंदाजांचे त्रिफळे उडवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 3:51 PM

Open in App

India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) दोन भन्नाट चेंडूंवर ऑसी फलंदाजांचे त्रिफळे उडवले. मार्नस लाबुशेन व पीटर हँड्सकोम्ब यांना भारतीय गोलंदाजाने त्रिफळाचीत केले. हँड्सकोम्बचा त्रिफळा हवेत उडाला, एवढा भारी चेंडू शमीने टाकला. India vs Australia test series 

Video : नजर हटी, दुर्घटना...! स्टीव्ह स्मिथचा पायावर धोंडा, रवींद्र जडेजाने मिळवून दिली IMP विकेट

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा ( ७ धावांवर होता ) सोपा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टाकला. टॅव्हीस हेड व ख्वाजा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु आर अश्विनने हेडला ( ३२) माघारी पाठवले. मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनचा ( ३) त्रिफळा उडवला.  उस्मान ख्वाजा चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्याला कर्णधार स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली. खेळपट्टी गोलंदाजांना फार मदत करताना दिसत नव्हती, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लाईन लेन्थवरच लक्ष ठेवून फलंदाजाकडून चूक व्हायची अपेक्षा ठेवावी लागत होती. Ind vs aus scorecard

स्मिथ व ख्वाज यांनीही संयमी खेळ सुरू ठेवला. ख्वाजा व स्मिथ यांची २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी रवींद्र जडेजाने तोडली. जडेजाच्या चेंडूवर हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न फसला. स्मिथच्या बॅट अन् पॅडला चेंडू घासून यष्टिंवर आदळला. स्मिथने रागात बॅट मैदानावर आपटली. तो १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाने १७० धावांवर चौथी विकेट गमावली. Ind vs aus live  match

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामी
Open in App