सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी संयमी खेळी करताना अर्धशतकी भागीदारी केली. हिटमॅन रोहितने या भागीदारीत एक विक्रम नावावर करताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी'व्हिलियर्सला मागे टाकले.
तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रोहितने सावध खेळावर अधिक भर दिला. पहिल्या 17 चेंडूंत त्याला एकही धाव बनवता आली नव्हती आणि 18व्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचून धावांचे खाते उघडले. रोहितने सलग दुसऱ्या वर्षी भारताकडून पहिला षटकार खेचण्याचा मान पटकावला. वन डे कारकिर्दीतील हा त्याचा 204वा षटकार ठरला. रोहितने 2015 व 2016 मध्येही भारताकडून पहिला षटकार खेचला होता.
त्यानंतर रोहितने आणखी दोन षटकार खेचून डी'व्हिलियर्सचा विक्रम मोडला. 2017 व 2018 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार खेचण्याचा विक्रम नावावर करणाऱ्या रोहितने 2019ची सुरुवातही षटकारानेच केली. त्याने तिसरा षटकार खेचताच विक्रम नावावर केला. वन डेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंमध्ये तो 205 षटकारांसह पाचव्या स्थानी आला आहे. त्याने डी'व्हिलियर्सचा 204 षटकारांचा विक्रम मोडला. या यादित पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी ( 351), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (275), श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (270) आणि धोनी आघाडीवर आहेत.
Web Title: India vs Australia 1st ODI: 'Hitman' Rohit Sharma breaks ab de villiers's record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.