सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या 288 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु 22 वर्षीय झाय रिचर्डसनने अत्यंत चतुराईने त्याला बाद केले. या विकेटनंतर रिचर्डसन याच्या चेहऱ्यावरील आनंद प्रचंड बोलका होता. भारताविरुद्ध पहिलाच सामना खेळणाऱ्या रिचर्डसनने त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर अंबाती रायुडूला बाद केले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 4 धावा अशी दयनीय झाली होती. भारताला धक्के देणारा हा रिचर्डसन आहे तरी कोण?
उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँड्सकोम्ब यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 288 धावा केल्या. त्यानंतर भारताची त्रेधातिरपीट झाली.
ऑस्ट्रेलियाकडून चार वन डे सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. 3 बाद 92 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. ट्वेंटी-20 त्याने 9 सामन्यांत 7 बळी टिपले आहेत.