Join us  

Video: भारताला 'अपघाताने' मिळाली विकेट; KL Rahul चुकूनही फलंदाज गेला माघारी

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 4:02 PM

Open in App

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का देताना ऑस्ट्रेलियाला संकटात टाकले होते. पण, गचाळ क्षेत्ररणक्षण आणि झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाची संधी मिळाली. डेव्हिड वॉर्नरने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना अर्धशतक झळकावले. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन चांगले खेळले, परंतु लाबुशेनच्या विकेटने कांगारू गोंधळले. 

मोहम्मद शमी विकेट घेतली अन् ४ षटकं फेकून दमला, बाहेर गेला; श्रेयस अय्यरने सोपा झेल सोडला, Video 

लोकेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला ( ४) माघारी पाठवले. पण, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांनी चांगला खेळ सेट केला. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणले, परंतु त्याच्या पहिल्याच षटकात वॉर्नरचा सोपा झेल मिड ऑनला श्रेयस अय्यरने टाकला. वॉर्नरने त्यानंतर शार्दूलसह आर अश्विनलाही चोपून काढले.  १०६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी रवींद्र जडेजाने तोडली. वॉर्नर ५३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर झेलबाद झाला. 

ब्रेक घेऊन पुन्हा मैदानावर आलेल्या मोहम्मद शमीने ऑसींना तिसरा धक्का दिला. त्याने स्मिथचा ( ४१) त्रिफळा उडवला. मार्नस लाबुशेन व कॅमरून ग्रीन यांनी ऑसींचा डाव सावरला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर लाबुशेनने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू त्याच्या बॅटच्या बाजूने राहुलच्या दिशेने गेला. राहुलला हा चेंडू टिपता आला नाही, परंतु तो त्याच्या बॅटला लागून यष्टिंवर आदळला अन् भारताने स्टम्पिंगची अपील केले. चेंडू जेव्हा बेल्सवर आदळला तेव्हा लाबुशेनचा पाय क्रीज बाहेर होते अन् अपघाताने त्याला माघारी जावे लागले. ऑस्ट्रेलियाला १५७ धावांवर चौथा धक्का बसला. लाबुशेन ३९ धावांवर बाद झाला अन् ग्रीनसोबत ४५ धावांची भागीदारी तुटली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनलोकेश राहुल