Join us  

KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलसाठी आजचा दिवस काही खास जाताना दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 5:08 PM

Open in App

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलसाठी आजचा दिवस काही खास जाताना दिसत नाही. यष्टिंमागील त्याची कामगिरी अत्यंत सुमार झालेली पाहायला मिळतेय. त्याला अपघाताने एक स्टम्पिंग मिळाला. पण, त्याही नतंर त्याची कामगिरी काही खास सुधारली नाही. असंच काहीचं कॅमेरून ग्रीनची विकेट मिळवण्यासाठी घडले. ऑस्ट्रेलियन फलंदाज चूकला नसता तर त्याने भारतीय गोलंदाजांना चांगलाच कुटला असता.

वर्ल्ड कप विजेता होणार मालामाल; आयसीसी करणार ८३ कोटींच्या बक्षीस रक्कमेचा वर्षाव

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का देताना ऑस्ट्रेलियाला संकटात टाकले होते. पण, गचाळ क्षेत्ररणक्षण आणि झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाची संधी मिळाली. स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांनी  १०६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणले, परंतु श्रेयस अय्यराने मिड ऑनला वॉर्नरचा झेल टाकला. रवींद्र जडेजाने ही विकेट मिळवली आणि वॉर्नर ५३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर झेलबाद झाला. ( IND vs AUS Live ScoreCard Marathi ) 

शमीने ऑसींना तिसरा धक्का देताना स्मिथचा ( ४१) त्रिफळा उडवला. मार्नस लाबुशेन व कॅमरून ग्रीन यांनी ४५ धावांची भागीदारी करून पुन्हा सामना ऑसींच्या बाजूने झुकवला. पण, अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात लाबुशेन बाद झाला. लोकेशच्या पॅडला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् तिसऱ्या अम्पायरने लाबुशेनला ( ३९) स्टम्पिंग आऊट दिले. जोश इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांना मोठी भागीदारी करून ऑसींसाठी धावांचा डोंगर उभा करण्याची संधी होती, परंतु दोघांमधील ताळमेळ चूकला. शमीच्या गोलंदाजीवर ग्रीन स्ट्राईकवर होता, परंतु चेंडू त्याला चकवून यष्टिरक्षकाकडे गेला. लोकेशकडून चेंडू सुटला अन् दोघं फलंदाज धाव घेण्यासाठी पळाले. ग्रीनला दुसरी धाव हवी होती, परंतु इंग्लिसचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. ग्रीन क्रिज सोडून बराच पुढे आला होता आणि तितक्यात राहुलने चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला फेकला अन् सूर्यकुमारने चूक न करतान ग्रीनला ( ३१) रन आऊट केला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलमोहम्मद शामीसूर्यकुमार अशोक यादव