Join us  

मोहम्मद शमीने घेतल्या ५ विकेट्स! तीनशेपार सहज जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाची गाडी घसरली

India vs Australia 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने चांगली कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 5:28 PM

Open in App

India vs Australia 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमी ( Mohammed Shami) चमकला. शमीने १० षटकांत १ निर्धाव षटक फेकताना ५१ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस यांची फलंदाजी पाहण्यासारखी होती. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर उतरला, परंतु यष्टिरक्षक म्हणून राहुल आज फेल गेला. जसप्रीत बुमराहला त्याच्या १०व्या षटकात विकेट मिळाली. 

KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video

भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का देताना ऑस्ट्रेलियाला संकटात टाकले होते. पण, गचाळ क्षेत्ररणक्षण आणि झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाची संधी मिळाली. स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांनी  १०६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणले, परंतु श्रेयस अय्यराने मिड ऑनला वॉर्नरचा झेल टाकला. रवींद्र जडेजाने ही विकेट मिळवली आणि वॉर्नर ५३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर झेलबाद झाला. 

शमीने ऑसींना तिसरा धक्का देताना स्मिथचा ( ४१) त्रिफळा उडवला. मार्नस लाबुशेन व कॅमरून ग्रीन यांनी ४५ धावांची भागीदारी करून पुन्हा सामना ऑसींच्या बाजूने झुकवला. पण, अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात लाबुशेन बाद झाला. लोकेशच्या पॅडला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् तिसऱ्या अम्पायरने लाबुशेनला ( ३९) स्टम्पिंग आऊट दिले. जोश इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांच्यातलं ताळमेळ चुकल्याने भारताला एक विकेट मिळाली. ग्रीन ३१ धावांवर बाद झाला. इंग्लिस व मार्कस स्टॉयनिस यांनी दमदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शमीने पुन्हा उपयुक्त मारा करताना स्टॉयनिसचा ( २९) दांडा उडवला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २७६ धावांवर ऑल आऊट झाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामी