याला कॅप्टन कुणी केला? KL Rahulने सोपा रन आऊट सोडला, सूर्यकुमार यादवची रिॲक्शन पाहा

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 04:35 PM2023-09-22T16:35:03+5:302023-09-22T16:35:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 1st ODI Live Marathi Updates :  KL Rahul trolled for missing easy run-out, look suryakumar yadav reaction | याला कॅप्टन कुणी केला? KL Rahulने सोपा रन आऊट सोडला, सूर्यकुमार यादवची रिॲक्शन पाहा

याला कॅप्टन कुणी केला? KL Rahulने सोपा रन आऊट सोडला, सूर्यकुमार यादवची रिॲक्शन पाहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताला ही शेवटची संधी आहे. पहिल्या दोन वन डे सामन्यांत रोहित, विराट, हार्दिक व कुलदीप यांना विश्रांती दिल्याने लोकेश नेतृत्व करतोय. पण, त्याच्यावर नेटिझन्स चिडले आहेत.

भारताला 'अपघाताने' मिळाली विकेट; KL Rahul चुकूनही फलंदाज गेला माघारी

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला माघारी पाठवले. पण, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी ९४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. वॉर्नरला ५२ धावांवर रवींद्र जडेजाने माघारी पाठवले. शमीने त्यानंतर स्मिथची विकेट घेतली. पण, लोकेश राहुलने यष्टिंमागे चूक केली. मार्नस लाबुशेनला रन आऊट करण्याची सोपी संधी त्याने गमावली. लाबुशेनने कव्हर ड्राईव्ह मारला आणि चेंडू सूर्यकुमार यादवच्या हाती जातोय हे दिसताच लाबुशेन क्रिजच्या मध्यभागी येऊन पुन्हा परतला. तेवढ्यात सूर्याने चेंडू यष्टिरक्षक लोकेशच्या दिशेने फेकला. पण, लोकेशला तो पकडता आला नाही आणि लाबुशेनला जीवदान मिळाले. ( IND vs AUS Live ScoreCard Marathi ) 




पण, अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात लाबुशेन बाद झाला. लोकेशच्या पॅडला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् तिसऱ्या अम्पायरने लाबुशेनला ( ३९) स्टम्पिंग आऊट दिले. ऑस्ट्रेलियाच्या ३८ षटकांत ४ बाद १७७ धावा झाल्या आहेत.
 

Web Title: India vs Australia 1st ODI Live Marathi Updates :  KL Rahul trolled for missing easy run-out, look suryakumar yadav reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.