Join us  

India vs Australia 1st ODI :  ना गावस्कर, ना तेंडुलकर, ना द्रविड... कुणालाही न जमलेला पराक्रम रोहितने केला!

India vs Australia 1st ODI:कन्याप्राप्ती झाल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 3:25 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कन्याप्राप्ती झाल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यांत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतले असताना रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह डाव सावरला. त्यानंतर सामन्याची सर्व सूत्रे हाती घेताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने शतकी खेळी करून वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. त्याचे हे शतक भारतीयांची छाती अभिमानाने उंचावणारे ठरले.

रोहितने 110 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यात 8 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियातील त्याचे हे 7 वे वन डे शतक ठरले. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर 9 शतकांसह आघाडीवर आहे, तर कर्णधार विराट कोहली (5) तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितचे हे वन डेतील 22 वे शतक ठरले आणि त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.  रोहितचे हे ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचे चौथे शतक ठरले आणि अशी कामगिरी याआधी कोणालाही करता आलेली नाही. रिचर्ड यांनी तीन शतकं केली होती, रोहितने आज त्यांना पिछाडीवर टाकलं.   रोहितने 2019 मधील पहिलेच शतक झळकावले. भारताकडूनही शकती बोहनी करण्याचा पराक्रम त्याने केला. याआधी 2015 व 2016 मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती. 

 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया