भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः यजमान भारताला पहिल्या वन डे सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांचा अपयशाचा पाढा गोलंदाजांनीही गिरवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. नववर्षातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यातील या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.
India vs Australia: वॉर्नर-फिंचनं रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध 'हा' विक्रम ठरला खास
India vs Australia: पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार
नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटलाही प्रथम गोलंदाजीच हवी होती, परंतु नाणेफेक फिंचनं जिंकली. लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला.
India vs Australia : दहा विकेट्सने लाजीरवाणा पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही, तर...
India vs Australia : डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास; देशासाठी केला मोठा पराक्रम
India vs Australia : वॉर्नर आणि फिंच यांनी विश्वविक्रमासह भारताला दिला पराभवाचा धक्का
255 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचीही तशीच अवस्था होईल, असं अनेकांना वाटत होते. पण, वॉर्नर आणि फिंच या जोडीनं खेळपट्टीवर तंबू रोवला आणि यजमानांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून वन डे क्रिकेटमध्ये दहा विकेट्सनी हार पत्करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. दहा विकेट्सनं वन डे क्रिकेटमध्ये पराभव पत्करणारा तो पाचवा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर ( 1981), सचिन तेंडुलकर ( 1997), सौरव गांगुली ( 2000) आणि राहुल द्रविड ( 2005) यांनी हा पराक्रम केला.