भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला रोहित शर्मा या मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. पण, सराव करताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत गंभीर नसून तो पहिल्या वन डेत खेळेल, असे संकेत कर्णधार विराट कोहलीनं दिले आहेत. पण, रोहितच्या समावेशामुळे सलामीसाठी त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार आहे आणि कोहलीनं त्यावरही तोडगा शोधला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे कोणते 11 शिलेदार खेळतील याचं, भाकित कोहलीनं केलं आहे.
रोहित, शिखर धवन आणि लोकेश राहुल असे सलामीला तीन पर्याय सध्या टीम इंडियाकडे उपलब्ध आहेत. शिखरनं टीम इंडियात पुनरागमन करताना श्रीलंकेविरुद्ध साजेशी कामगिरी केली. त्यात लोकेश राहुल सातत्यपूर्ण खेळ करत आहे आणि रोहित हा संघाचा नियमित सलामीवर आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता होती. पण, उद्याच्या सामन्यात हे तिघेही अंतिम अकरामध्ये दिसणार असल्याचे संकेत कोहलीनं दिले. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहली सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यात आता वन डे संघातही कोहली तिसऱ्या क्रमांकाचा त्याग करणार आहे.
टीम इंडियाला 2-1 असं नमवणार, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा दावा
टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅन रोहितला सराव करताना दुखापत
कोहलीच्या या निर्णयानं संघातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरला पाचव्या स्थानी यावे लागेल. अशात केदार जाधवला संघाबाहेर बसावे लागेल. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह वन डे संघात कमबॅक करणार आहे. त्याच्यासोबत मोहम्मद शमी जलदगती गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. तिसऱ्या स्थानासाठी शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यात शर्यत आहे. रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघात असेल. त्याला शिवम दुबेची साथ मिळू शकते.
टीम इंडियाला नमवण्यासाठी कांगारूंचा मास्टर प्लान; उतरवणार हुकुमी एक्का
भारताचे संभाव्य अकरा खेळाडू - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी/ शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.
वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू