India vs Australia 1st T20 : 'विराट'सेना ऑस्ट्रेलिया मुकाबला करण्यासाठी सज्ज, सामना कधी व कोठे? 

India vs Australia 1st T20I : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 05:15 PM2019-02-24T17:15:28+5:302019-02-24T17:23:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 1st T20I: India ready to take Australia, When and where to watch match? | India vs Australia 1st T20 : 'विराट'सेना ऑस्ट्रेलिया मुकाबला करण्यासाठी सज्ज, सामना कधी व कोठे? 

India vs Australia 1st T20 : 'विराट'सेना ऑस्ट्रेलिया मुकाबला करण्यासाठी सज्ज, सामना कधी व कोठे? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिले जात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला ट्वेंटी-20 सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजसेखरा रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून याच सामन्याचे सुरुवात होईल. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. लोकेश राहुल, विजय शंकर आणि रिषभ पंत यांना वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान पक्के करण्यासाठी ही शेवटची संधी असेल.



ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 तील विक्रम भारताच्या बाजूने आहे. भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर खेळलेल्या 6 ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारवेळा पराभूत केले आहे, तर एकदा यजमानांना पराभव पत्करावा लागला आहे. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विक्रमाची संधी आहे. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 5 अर्धशतकं झळकावली आहेत. एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात त्यानं श्रीलंकेच्या कुशल परेराशी बरोबरी केली आहे. ऑसीविरुद्धच्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने एक अर्धशतक झळकावल्यास या विक्रमात तो आघाडी घेऊ शकतो. 
 

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याबद्दल सर्वकाही
वेळ : सायंकाळी 7 वाजल्यापासून, 6 वाजता अंतिम संघ जाहीर करण्यात येईल
स्थळ : डॉ. वाय. एस. राजसेखरा रेड्डी क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1/ HD आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी/ HD
लाईव्ह ब्लॉग : http://www.lokmat.com/



संभाव्य संघ :
भारत - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जस्प्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच, डी, आर्सी शॉर्ट, पॅट कमिन्स, अॅलेक्स करी, जेसन बेहरेनडॉफ, नॅथन कोल्टर-नील, पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉयनीस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा. 

Web Title: India vs Australia 1st T20I: India ready to take Australia, When and where to watch match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.