ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. भारताला पहिल्या दोन वन डे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आहे आणि त्याच सकारात्मकतेनं ते ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहेत. आजपासून दोन्ही संघांमधल्या ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आजच्या सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul) सलामीला येण्याची शक्यता आहे, तर मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) त्याला कडवी टक्कर देण्यासाठी मैदानात उरतण्यासाठी सज्ज झाला आहे. जाणून घेऊया आजच्या सामन्यात दोन्ही संघांची संभाव्या Playing XI..
टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर हे ट्वेंटी-20 संघात आहेत आणि चहरचे अंतिम ११मध्ये खेळणे निश्चित आहे, तर सुंदरला एखाद्या सामन्यात संधी मिळू शकते. फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल पाहायला मिळेल. लोकेश राहुल आणि शिखर धवन ही जोडी सलामीला दिसेल, तर मयांकला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. टीम इंडिया आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टी नटराजन ( T Natarajan) ट्वेंटी-20 संघात पदार्पण करणार आहे. युजवेंद्र चहलचे कमबॅक होणार आहे.
ऑस्ट्रेलियाला संघाला डेव्हिड वॉर्नरची उणीव जाणवणार आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात वॉर्नरला दुखापत झाली आणि त्यानं ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली. पॅट कमिन्सलाही विश्रांती देण्यात आली आहे. वॉर्नरच्या जागी अष्टपैलू डी'आर्सी शॉर्टला संधी दिली आहे. अँड्य्रू टाय अंतिम ११मध्ये खेळताना दिसेल.
भारताचे playing XI: लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, टी नटराजन, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया playing XI: अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, स्टीव्हन स्मिथ, डी'आर्सी शॉर्ट, अॅडम झम्पा, मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, सीन अॅबोट