ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. भारताला पहिल्या दोन वन डे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आहे आणि त्याच सकारात्मकतेनं ते ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, टीम इंडिया तगडं आव्हान ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, सामन्यापूर्वी BCCIच्या ट्विटनं एकच गोंधळ उडवला.
लोकेश राहुल व शिखर धवन यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली, परंतु धवन ( १) तिसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. या सामन्यापूर्वी बीसीसीआयनं प्लेईंन इलेव्हन ट्विट केले. त्यात त्यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले होते. पण, नाणेफेकीच्या वेळी कर्णधार विराट कोहलीनं आजच्या सामन्यात मनीष पांडेला संधी दिल्याचे सांगितले. त्यामुळे गोंधळ उडाला.
ही चूक लक्षात येताच बीसीसीआयनं पुन्हा सुधारित ट्विट केले.
ऑस्ट्रेलियाचा संघ - अॅरोन फिंच, डी'आर्सी शॉर्ट, मॅथ्यू वेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईजेस हेन्रीक्स, सीन अॅबोट, मिचेल स्टार्कस मिचेल स्वेप्सन, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड
भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन
Web Title: India vs Australia, 1st T20I : Manish Pandey Playing, NO Shreyas Iyer; BCCI Tweet make confusion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.