Join us  

India vs Australia, 1st T20I : जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती; टीम इंडियानं आखली भारी रणनीती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 04, 2020 1:25 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. भारताला पहिल्या दोन वन डे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आहे आणि त्याच सकारात्मकतेनं ते ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, टीम इंडिया तगडं आव्हान ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.  दोन्ही संघांमधील आकडेवारीएकूण टी-२० सामने - २१भारत विजयी   -  ११ऑस्ट्रेलिया विजयी -   ८सामना रद्द     १निकाल नाही     १२००७ च्या पहिल्या सामन्यात भारत विजयी तर   २०१९ च्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला होता.ऑस्ट्रेलियात टी-२० मालिकेतील भारताची कामिगरीएकूण मालिका     ४भारत विजयी     १ऑस्ट्रेलिया विजयी     १बरोबरीत     २ऑस्ट्रेलियात टी-२० सामन्यांत भारताची कामगिरीएकूण सामने     ८भारत विजयी     ५ऑस्ट्रेलिया विजयी     ३अनिर्णीत     ०

टीम इंडियाचा प्लान

जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरणार आहेत. संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळेल. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन अष्टपैलू खेळाडू संघात आहे. मोहम्मद शमी, टी नटराजन व दीपक चहर हे ३ जलदगती गोलंदाज असतील. 

ऑस्ट्रेलियाचा संघ  - अॅरोन फिंच, डी'आर्सी शॉर्ट, मॅथ्यू वेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईजेस हेन्रीक्स, सीन अॅबोट, मिचेल स्टार्कस मिचेल स्वेप्सन, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड

 

भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे,  संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटजसप्रित बुमराहयुजवेंद्र चहल