ठळक मुद्देभारताच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 9 बाद 250 धावाचेतेश्वर पुजाराची 246 चेंडूंत 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी चेतेश्वर पुजाराच्या कसोटीतील 5000 धावा पूर्ण
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी आत्मघातकी फटके मारून संघाला अडचणीत आणले. मात्र, चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करून भारताची लाज राखली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आखलेल्या रणनितीची उत्तम अंमलबजावणी करताना पाहुण्यांना धक्का देण्याचे सत्र कायम राखले, परंतु त्यांना पुजाराला रोखण्यात अपयश आले. पुजाराने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिवसाची अखेरची विकेट ही त्याचीच पडली. सामन्यानंतर त्याने बीसीसीआयकडे एक इच्छा व्यक्त केली. खेळाडूंच्या तंदुरूस्तीची कसोटी पाहणाऱ्या पहिल्या दिवसात पुजाराने 40 डिग्री सेल्सिअस तापामानात खेळपट्टीवर चांगलाच पाय रोवला. त्याने 246 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताचा डाव सावरला. 4 बाद 41 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला पुजारा धावून आला. पुजाराने रोहित शर्मा (45 धावांची भागीदारी), रिषभ पंत ( 41 ), आर अश्विन ( 62), मोहम्मद शमी ( 40) यांच्यासह उपयुक्त भागीदारी केल्या. मात्र दिवसाचा खेळ संपायला दोन षटके शिल्लक असताना पुजाराला माघारी जावे लागले. पॅट कमिन्सने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पुजाराला धावबाद केले.पहिल्या दिवसाच्या खेळीबाबत पुजारा म्हणाला,'' प्रचंड गरम आणि आर्द्रता यामुळे येथे खेळणे आव्हानात्मक होते. भारतात आम्ही अशाच वातावरणात खेळत असलो तरी ऑस्ट्रेलियातील ऊन कडक होते. त्यामुळे मी आता आईस बाथ घेणार आहे. तसे मला फारसे आईस बाथ घ्यायला आवडत नाही, परंतु मी आज तो घेणार आहे. त्यानंतर मी चॉकलेट मिल्क शेक पिणार आहे."
पाहा संपूर्ण व्हिडीओ...
( http://www.bcci.tv/videos/id/7140/why-pujara-wants-a-milkshake-post-his-adelaide-ton)