India vs Australia, 1st Test : अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video

India vs Australia, 1st Test, Day 1 : विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला. या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 17, 2020 04:35 PM2020-12-17T16:35:35+5:302020-12-17T16:37:10+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 1st Test, Day 1 : Virat Kohli done all hard work but one bad call from Ajinkya Rahane ended everything, Video | India vs Australia, 1st Test : अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video

India vs Australia, 1st Test : अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेतेश्वर पुजारानं कर्णधार विराट कोहलीसह ( Virat Kohli) पहिला दिवस गाजवला. पुजारा अर्धशतकापासून वंचित राहिला असला तरी विराटनं दुसऱ्या बाजूनं कॅप्टन्स नॉक खेळून टीम इंडियाला पहिल्या दिवशी समाधानकारक मजल मारून दिली. अजिंक्य रहाणेनेही ( Ajinkya Rahane) दमदार खेळ केला. पण, रहाणेच्या एका चूकीच्या कॉलनं विराटला शतकपासून वंचित ठेवले. त्यानंतर टीम इंडियाची सामन्यावरील पकडही निसटली.

पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. १९१ चेंडूंतील ६८ धावांची भागीदारी ५०व्या षटकात संपुष्टात आली. नॅथनच्या गोलंदाजीवर गलीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेननं झेल टिपून पुजाराला माघारी जाण्यास भाग पाडले. मैदानावरील पंचांनी नाबाद देताच ऑसी संघानं DRSघेतला आणि त्यात चेंडू बॅटवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. पुजारा १६० चेंडूंत २ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. १७ धावांवर असताना विराटला दिलेलं जीवदान ऑस्ट्रेलियाला महागात पडले.

विराटनं चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत होती. विराट या वर्षाच्या अखेरच्या कसोटीत शतकी खेळी करेल असा विश्वास होता, परंतु ७७व्या षटकात अजिंक्यनं चुकीचा कॉल दिल्यानं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले.

नॅथनच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी कॉल दिला, परंतु विराट खेळपट्टीच्या मधोमध आल्यानंतर त्यानं माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत जोश हेझलवूडनं चेंडू नॅथनकडे सोपवला होता आणि विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला. या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले. अजिंक्य ९२ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारासह ४२ धावांवर बाद झाला. विराटची विकेट टर्नींग पॉईंट ठरली आणि टीम इंडियानं पहिल्या सामन्यावर घेतलेली पकड गमावली. 

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: India vs Australia, 1st Test, Day 1 : Virat Kohli done all hard work but one bad call from Ajinkya Rahane ended everything, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.