India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी ऑसींना धक्के देताना त्यांचे पाच फलंदाज अवघ्या ७९ धावांत माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथला बाद करून अश्विननं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यापाठोपाठ त्यानं ट्रॅव्हीस हेड व कॅमेरून ग्रीनला बाद केले. पण, ऑसींचा मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) खेळपट्टीवर चिकटून बसला आहे. त्याला भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन जीवदान दिले आणि तेच आता महागात पडत असल्याचे दिसत आहेत.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा ( ४३), विराट कोहली ( ७४) आणि अजिंक्य रहाणे ( ४२) वगळता अन्य फलंदाजांनी ऑसी गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पहिल्या दिवसाच्या ६ बाद २३३ धावसंख्येत अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने तीन आणि जोश हेझलवूड व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं धक्के दिले. मॅथ्यू वेड ( ८) व जो बर्न्स ( ८) यांना बुमराहनं पायचीत केलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांचे झेल सोडले. लाबुशेन व स्मिथ ही जोडी डोईजड होईल असे वाटत असताना विराटनं चेंडू आर अश्विनच्या ( R Ashwin) हाती सोपलला आणि त्यानं यश मिळवून दिलं. अश्विननं सुरुवातीला स्मिथला ( १) स्लीपमध्ये झेलबाद केलं, त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर ट्रॅव्हीस हेडचा ( ७) झेल टिपला. त्यानंतर अश्विननं पदार्पणवीर कॅमेरून ग्रीनला (११) माघारी पाठवले.
पाहा गचाळ क्षेत्ररक्षण....