IND vs AUS 1st Test : रोहित, अश्विन रस्त्यावर उतरले अन् सगळे पाहातच राहिले!

India vs Australia 1st Test : अॅडलेड ओव्हल मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 03:06 PM2018-12-05T15:06:22+5:302018-12-05T15:13:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 1st Test : Rohit Sharma & R. Ashwin surprise fans on the streets of Adelaide | IND vs AUS 1st Test : रोहित, अश्विन रस्त्यावर उतरले अन् सगळे पाहातच राहिले!

IND vs AUS 1st Test : रोहित, अश्विन रस्त्यावर उतरले अन् सगळे पाहातच राहिले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना गुरुवारपासूनविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरीसाठी भारत सज्जभारतीय खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड ओव्हल मैदानावर गुरुवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी यजमान आणि पाहुण्या संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. मात्र, भारतीय संघ कोणत्या अंतिम अकरासह मैदानात उतरेल हे उद्याच स्पष्ट होईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याची हीच योग्य संधी असल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. भारतीय खेळाडूही हा दावा खरा करण्यासाठी सज्ज आहेत. पण, त्याचे कोणतेही दडपण न घेता भारतीय चमूत अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. भारत आर्मीही भारताला चिअर करण्यासाठी येथे दाखल झाली आहे. याच खेळीमेळीच्या वातावरणात बुधवारी रोहित शर्मा आणि आर अश्विन हे चक्क रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. 



भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्या कसोटीसाठी अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. पण, तो नक्की कोणत्या क्रमवारीत फलंदाजीला येईल हे उद्याच स्पष्ट होईल. पृथ्वी शॉ दुखापत ग्रस्त झाल्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. अंतिम 12 मध्ये सहभागी असलेल्या रोहित आणि अश्विन यांनी बुधवारी अॅडलेड स्टेडियमबाहेर पायी फेरफटका मारला. त्यांनी यावेळी क्रिकेट चाहत्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. 


यावेळी रोहित म्हणाला,''कसोटी मालिकेसाठी आम्ही कसून सराव केलेला आहे. सराव सामन्यातही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. संघातील खेळाडूही चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. पहिल्या कसोटीसाठी आम्ही जेवढे उत्सुक आहोत, तेवढेच चाहते आहेत का, हे आम्हाला पाहायचे आहे. त्यासाठी आम्ही पायी फिरत आहोत. स्टेडियम ते हॉटेल हे अंतर पायी दोन मिनिटांचे आहे, परंतु बसने 20 मिनिटे लागतात. त्यामुळे वेळ वाचवण्याचाही आमचा मानस आहे.'' 

संपूर्ण व्हिडीओ....

( http://www.bcci.tv/videos/id/7137/rohit-and-ashwin-surprise-fans-on-the-streets-of-adelaide )

Web Title: India vs Australia 1st Test : Rohit Sharma & R. Ashwin surprise fans on the streets of Adelaide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.