India vs Australia, 1st Test, 3rd Day : पहिल्या डावात ड्रायव्हिंग सीटवर बसलेली टीम इंडिया कसोटीवरील पकड मजबूत करेल, असे वाटत होते. पण, तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडगोळीनं टीम इंडियाला हादरवले. १ बाद ९ अशा धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठीचे ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला बुमराह ( २) माघारी परतला. त्यानंतर अन्य फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तेही अपयशी ठरले. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकले नाहीत. आर अश्विनही शून्यावर बाद झाला. विराट कोहली ( ४), पृथ्वी शॉ ( ४), हनुमा विहारी (८), वृद्धीमान सहा ( ४), उमेश यादव ( ४*) हेही एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियाचा एकही शिलेदार दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.
२२व्या षटकात मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांचा मजबूत पाया रचला. वेड ३३ धावांवर धावबाद झाला. जो बर्न ६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर नाबाद राहिला. मार्नस लाबुशेन ६ धावांवर बाद झाला.
भारतीय फलंदाजांनी किती काळ खेळपट्टीवर तग धऱला
फलंदाज पहिला डाव दुसरा डाव
पृथ्वी शॉ ४ मिनिटे १५ मिनिटे
मयांक अग्रवाल ४० मिनिटे ५७ मिनिटे
चेतेश्वर पुजारा २१८ मिनिटे १७ मिनिटे
विराट कोहली २४५ मिनिटे १८ मिनिटे
अजिंक्य रहाणे १३० मिनिटे ४ मिनिटे
हनुमा विहारी ३१ मिनिटे ४४ मिनिटे
वृद्धीमान सहा ४९ मिनिटे २७ मिनिटे
आर अश्विन २९ मिनिटे ३ मिनिटे
उमेश यादव १६ मिनिटे २० मिनिटे
जसप्रीत बुमराह १४ मिनिटे २२ मिनिटे
मोहम्मद शमी ५ मिनिटे ६ मिनिटे
Web Title: India vs Australia, 1st Test : TIME SPENT BY INDIAN BATSMEN AT THE CREASE IN Adelaide Test; know all players timing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.