India vs Australia, Day & Night Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात आजपासून होत आहे. ॲडिलेड येथे गुलाबी चेंडूने विद्युत प्रकाशझोतात ( Day & Night Test) पहिला सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ सज्ज असून यजमान संघ मात्र दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वपचा काढण्यास आसुसलेला असेल. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली म्हणजे हा सामनाही आपणच जिंकणार, त्याला कारणही तसेच आहे..
भारतीय संघ - पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ - जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड
विराट कोहलीनं आतापर्यंत २६ कसोटी सामन्यांत नाणेफेक जिंकली आणि त्यापैकी एकही सामना टीम इंडियानं गमावलेला नाही. त्यापैकी २१ सामन्यांत भारतानं विजय मिळवला असून ४ सामने अनिर्णीत राहिले आहेत. पण, ऑस्ट्रेलियानंही अॅडलेडवर खेळलेले चारही पिंक बॉल टेस्ट जिंकल्या आहेत.