India vs Australia, 1st Test, 3rd Day : पहिल्या डावात ड्रायव्हिंग सीटवर बसलेली टीम इंडिया कसोटीवरील पकड मजबूत करेल, असे वाटत होते. पण, तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडगोळीनं टीम इंडियाला हादरवले. १ बाद ९ अशा धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठीचे ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. भारताच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. शिवाय कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. ९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांचा मजबूत पाया रचला. वेड ३३ धावांवर धावबाद झाला. जो बर्न ६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर नाबाद राहिला. मार्नस लाबुशेन ६ धावांवर बाद झाला.
भारतीय फलंदाजांच्या शरणागतीवर माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं OTP तयार केला.