अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला वन डे मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी अॅडलेड येथे होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात 34 धावांनी विजय नोंदवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सिडनीतील सामन्यात गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत दिलेल्या 50 धावा भारताला महागात पडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 5 बाद 288 धावांचे आव्हान उभं करता आलं. प्रत्युत्तरात भारताला 9 बाद 254 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराला परत बोलावण्याची मागणी जोर धरू लागली आणि भुवनेश्वर कुमारवर टीकाही झाली.
पहिल्या सामन्यातील चुकांतून धडा घेत भुवनेश्वर कुमार ऑसी फलंदाजांना रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडनीवरील सामन्यात भुवनेश्वरने 10 षटकांत 66 धावा दिल्या होत्या आणि त्यामुळे पराभवानंतर त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्या सामन्यातील चुका सुधारण्यासाठी भुवनेश्वर कसून सराव करत आहे. तो यॉर्करचा मारा करण्यासाठी खास टेक्निकचा वापर करत आहे. त्याची ही टेक्निक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु भुवनेश्वरने त्यामागचं कारणही सांगितलं आहे.पाहा व्हिडीओ...