राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यातही भारताला धक्का बसला होता. भारताला जर असेच धक्के बसत राहीले तर त्यांचे काही खरे नाही, असे म्हटले जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंतला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे पंतला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले होते. त्यामुळे पंतला दुसऱ्या सामन्यात खेळता आले नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जास्त धावा सलामीवीर शिखर धवनने केल्या. पण ही खेळी साकारत असताना त्याला दुखापत झाली. शतकासाठी फक्त चार धावा कमी असताना धवन आऊट झाला. धवनची ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे धवन दुसऱ्या सामन्यातून आऊट झाला आहे. आता तिसऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
भारताविरुद्धचा 'तो' निर्णय पंचांनी बदललाराजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंचांनी एक निर्णय बदलल्याचे पाहायला मिळाले. हा निर्णय पंचांनी भारताविरुद्धच दिला होता. पंचांनी हा निर्णय बदलल्यामुळे भारताला दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
या सामन्यात भारताच्या फलंदाजानी एका नियमाचा भंग केला होता. त्यानंतर भारताला पंचांनी दंड ठोठावला होता. पण पहिला डाव संपल्यावर मात्र पंचांनी आपला हा निर्णय बदलल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय फलंदाजी करत असाताना भारताचा कर्णधार विराट कोहली लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा हे तिघेही खेळपट्टीवरून धावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंचांनी भारताला पाच धावांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या पाच अतिरीक्त धावा मिळाल्या होत्या. पण डाव संपल्यावर पंचांनी हा निर्णय मागे घेतला आणि त्यामुळेच भारताच्या पाच धावा वाचल्या.