India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!

India vs Australia 2nd ODI: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 11:12 AM2019-01-15T11:12:38+5:302019-01-15T11:12:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 2nd ODI: Lightning quick from MSD, Dhoni is quick as anything and whips the bails off. | India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!

India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे आणि त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना 26 धावांवर माघारी पाठवून चांगली सुरुवात करून दिली.  मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाला 26 धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजाने अफलातून फिल्डींग करताना ही सेट जोडी तोडली.  गोलंदाजीतही जडेजाने आपली चुणूक दाखवताना पीटर हँड्सकोम्बला बाद केले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले.



सिडनी सामन्यातील भारताच्या पराभवाला धोनीची संथ खेळी कारणीभूत असल्याची टीका झाली. भारताचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतले असताना धोनीने रोहित शर्माच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहितने शतक पूर्ण करतान भारताला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी हा सामना जिंकला होता. धोनीनं 96 चेंडूंत 51 धावा केल्या आणि या पराभवाला त्याची ही संथ खेळी जबाबदार असल्याची टीका झाली.

धोनी थकलाय, अशी टीका करणाऱ्यांनी जरा थांबा... मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात धोनीनं ज्या चतुराईने केलेली स्टम्पिंग पाहून टीकाकारांचे मत नक्की बदलेल. 





पाहा व्हिडीओ... 


 

Web Title: India vs Australia 2nd ODI: Lightning quick from MSD, Dhoni is quick as anything and whips the bails off.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.