अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे आणि त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना 26 धावांवर माघारी पाठवून चांगली सुरुवात करून दिली. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाला 26 धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजाने अफलातून फिल्डींग करताना ही सेट जोडी तोडली. गोलंदाजीतही जडेजाने आपली चुणूक दाखवताना पीटर हँड्सकोम्बला बाद केले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले.
धोनी थकलाय, अशी टीका करणाऱ्यांनी जरा थांबा... मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात धोनीनं ज्या चतुराईने केलेली स्टम्पिंग पाहून टीकाकारांचे मत नक्की बदलेल.