Join us  

India vs Australia, 2nd ODI : भारताविरुद्धचा 'तो' निर्णय पंचांनी बदलला

पंचांनी हा निर्णय बदलल्यामुळे भारताला दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 7:12 PM

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंचांनी एक निर्णय बदलल्याचे पाहायला मिळाले. हा निर्णय पंचांनी भारताविरुद्धच दिला होता. पंचांनी हा निर्णय बदलल्यामुळे भारताला दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

या सामन्यात भारताच्या फलंदाजानी एका नियमाचा भंग केला होता. त्यानंतर भारताला पंचांनी दंड ठोठावला होता. पण पहिला डाव संपल्यावर मात्र पंचांनी आपला हा निर्णय बदलल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय फलंदाजी करत असाताना भारताचा कर्णधार विराट कोहलीलोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा हे तिघेही खेळपट्टीवरून धावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंचांनी भारताला पाच धावांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या पाच अतिरीक्त धावा मिळाल्या होत्या. पण डाव संपल्यावर पंचांनी हा निर्णय मागे घेतला आणि त्यामुळेच भारताच्या पाच धावा वाचल्या.

सामना सुरु असतानाच भारतीय संघाला झाली शिक्षा; ऑस्ट्रेलियाला कमी धावांचे टार्गेटऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना सुरु असताना भारतीय संघाला शिक्षा झाल्याचे पाहायला मिळाले. या शिक्षेमुळे आता ऑस्ट्रेलियाला कमी धावांचे टार्गेट देण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातील नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूनं लागला. या सामन्यात शिखर धवन 96 धावांवर माघारी परतला, तर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी करताना संघाला ३४० धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी केली. पण या दोघांनी दमदार कामगिरी केली असली तरी त्यांच्यामुळेच भारताला शिक्षा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांच्या चुकीमुळे सामना सुरु असतानाच भारतीय संघावर कारवाई करण्यात आली.

क्रिकेटचे काही नियम असतात, त्यांचा भंग केली की, शिक्षा केली आहे. जर कोणता खेळपट्टीला धोका पोचवत असेल तर संघावर कारवाई केली जाते. हीच गोष्ट या सामन्यात घडली. धावा काढताना पहिल्यांदा कोहली, त्यानंतर राहुल आणि रवींद्र जडेजा हे खेळपट्टीवरून धावले. त्यामुळे भारतावर पाच धावांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पाच धावा ऑस्ट्रेलियाला देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे टार्गेट आता ५ धावांनी कमी झाले आहे.

अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागच्या सामन्यातील चुका सुधारताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण, रोहित 44 चेंडूंत 42 धावा करून माघारी परतला. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. अॅडम झम्पानं त्याला 14व्या षटकात पायचीत केले. रोहितनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. पण, DRS मध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताला पहिला धक्का दिला.

भारतीय संघाला 81 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिखरनं या मालिकेतील सलग दुसरी अर्धशतकी खेळी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. शिखर तुफान फटकेबाजी करत होता. पण, 96 धावांवर त्यानं विकेट फेकली. त्याच्या बाद होण्यावर कोहलीनंही नाराजी प्रकट केली. धवन आणि विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. शिखर 90  चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 96 धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर 7 धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. 

विराटनं 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराटनं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात विराटनं 76 चेंडूंत 6 चौकारांसह 78 धावा केल्या. अॅश्टन अॅगर आणि मिचेल स्टार्क यांनी अप्रतिम सांघिक कामगिरी करताना विराटचा सुरेख झेल टीपला. मनिष पांडे काहीच कमाल न करता माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुलनं टीम इंडियाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात लोकेश धावबाद झाला. त्यानं 52 चेंडूंत 80 धावा केल्या. त्यात सहा चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. टीम इंडियानं 6 बाद 340 धावांपर्यंत मजल मारली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरवींद्र जडेजालोकेश राहुल