नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : नागपूर येथे सुरु असलेल्या जामठाच्या खेळपट्टीवर भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरस्थावर होता आले नाही. पण कोहलीने मात्र दमदार खेळी साकारत सर्वोत्तम फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
जामठ्याच्या मैदानात यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. पण या सामन्यात धोनी शून्यावर आऊट झाला. दुसरीकडे कोहलीने अर्धशतकाची वेस ओलांडली आणि त्यानंतर काही वेळात त्याने सर्वोत्तम फलंदाज होण्याचा जमान पटकावला.
या मैदानात धोनीच्या सर्वाधिक धावा होत्या. धोनीने चार डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 268 धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनीला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने त्याला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. या सामन्यापूर्वी कोहलीच्या या मैदानात 209 धावा होत्या. त्यामुळे सामना होण्यापूर्वी कोहली धोनीपेक्षा 59 धावांनी पिछाडीवर होता. कोहलीने या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी करत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे आता जामठ्याच्या मैदानात सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला आहे.
कोहलीचा असाही विक्रमएक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने या सामन्यात जेव्हा 22 धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याने हा विक्रम रचला. कोहलीने कर्णधार म्हणून कसोटीमध्ये 4815, वनडेमध्ये 3879 (नाबाद 22) आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 606 धावा केल्या आहेत. कोहलीने या नऊ हजार धावा 159 डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर सर्वाधिक सात हजार धावा बनवण्याचा विक्रम होता. लाराने 164 डावांमध्ये या धावा केल्या होत्या.
... तरीही ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, चाहत्यामध्ये जोरदार चर्चाभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी एक घटना घडली. ज्या घटनेमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. ही गोष्ट घडली ती टॉस करताना. भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच, सामनाधिकारी रंजन मदुगले आणि समालोचक संजय मांजरेकर हे उपस्थित होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
कोहलीच्या हातात नाणे होते. मांजरेकर यांनी सांगितल्यावर कोहलीने ते नाणे हवेत भिरकावले. त्यावेळी फिंचने 'हेड्स' असा कॉल दिला. हवेत भिरकावलेले नाणे यावेळी मैदानात पडले आणि मदुगले यांच्या डाव्या पायाला लागले. त्यानंतर त्यांनी फिंचने नाणेफेक जिंकल्याचे जाहीर केले. पण यानंतर ही नाणेफेक योग्य होती का, यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये आता चर्चा सुरु झाली आहे.