गुवाहाटी : वन-डे मालिकेनंतर पहिल्या टी-20त ऑस्ट्रेलियावर निर्वादित वर्चस्व गाजवणारी भारतीय संघाची फलंदाजी मोक्याच्या क्षणीच ढेपाळली आहे. कांगारुंविरोधातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचे रथी-महारथी फलंदाज सपशेल निष्प्रभ ठरले आणि अवघ्या 118 धावांत टीम इंडियाचा डाव आटोपला. त्यामुळे आता तगड्या कांगारुंसमोर विजयासाठी 118 धावांचे माफक आव्हान असून भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. जासन बेहरेंडोर्फ सुरुवातीला धारधार गोलंदाजी करताना भारताचे आघाडीचे चार फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. 16 धावांत चार धक्के बसलेला भारतीय संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही.
एसीए बारसापारा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
दुसऱ्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलियानं दमदार पुनरागमन केलं आहे. सुरुवतीलाच भारताला चार धक्के देत भारताची फलंदाजांची दाणादाण उडवण्यात कांगारुंना यश आले आहे. रोहित शर्मानं सलग दोन चौकर ठोकर दमदार सुरुवात केली. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर जासन बेहरेंडोर्फ रोहित शर्माला बाद केलं. रोहितनंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार विराट कोहली भोपळाही नं फोडता तंबूत परताला. त्यामुळे भारताचा डाव अडचणीत सापडला. कोहली बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्यामनिष पांडेनंभारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, बेहरनडॉर्फनं त्यालाही बाद करत भारतापुढील आडचणीत वाढवल्या. मनिष पांड्या तंबूत गेल्यानंतर केदार जाधव आणि शिखर धवननं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर शिखऱ बाद झाला. भारताचे आघाडीचे चारीही फलंदाजांना बेहरनडॉर्फनं बाद केलं.
आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर धोनी-जाधऴवर मोठी जबाबदारी होती मात्र दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यानं थोडासा प्रतिकार केला. मात्र एका बाजूनं विकेट पडत असल्यामुळे धावगती वाढवण्यात त्यालाही अपयश आलं. शेवटी कुलदीप यादवनं थोड्याफार फडकेबाजी केली. कुलदीप यादवनं 16 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या 25, कोदार जाधव 27 यांचे प्रयत्न भारताला मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरले.
प्रतिस्पर्धी संघ-भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जासन बेहरेंडोर्फ, नॅथन कुल्टर नाईल, अॅरोन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, अॅडम जम्पा, मार्क्स स्टोइनिस, अॅण्ड्र्यू टाय.