बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता म्हातारा झाला, अशी टीका काही जणांनी केली होती. पण धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. धोनीने या सामन्यात आपली विकेट वाचवण्यासाठी तब्बल 2.14 मी. आपले पाय स्ट्रेच केल्याचे पाहायला मिळाले.
धोनीचा षटकारांचा असा हा योगायोग
बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रिषभ पंत बाद झाला आणि धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात सहाव्या चेंडूवर धोनीने षटकार लगावला.
या सामन्यात धोनीच्या षटकारांचा अजब योगायोग पाहायला मिळाला. धोनीचा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील हा 50वा षटकार ठरला, तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 350वा सिक्सर ठरला. तेराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने मिडविकेटला षटकार लगावला.
Web Title: India vs Australia 2nd T20: See how fit Mahendra Singh Dhoni is
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.