Join us  

India vs Australia, 2nd T20I : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचची माघार; टीम इंडियातही तीन मोठे बदल

India vs Australia, 2nd T20I: टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 06, 2020 1:21 PM

Open in App

India vs Australia, 2nd T20I: टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरची ( David Warner) उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यात आता दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) यानं माघार घेतल्यानं त्यांची डोकेदुखी आणखी वाढली होती. त्यात कर्णधार अॅरोन फिंचही ( Aaron Finch) या सामन्यात खेळणार नाही. डॅनिएल सॅम्स ( Daniel Sams) या सामन्यातून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.

ऑस्ट्रेलिया संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि अॅश्टन अॅगर हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कसोटी मालिकेपूर्वी पॅट कमिन्सला मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मार्कस स्टॉयनिसही पूर्णपणे तंदुरूस्त नाही. त्याशिवाय कर्णधार अॅरोन फिंचही दुखापतग्रस्त आहे. तो आज खेळेल की नाही याचीही गॅरंटी नव्हतीच. फिंचच्या अनुपस्थितीतल मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. जोश हेझलवूडनेही दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घेतली आहे.

दुसरीकडे भारतीय संघातही तीन बदल पाहायला मिळत आहे. मनीष पांडेच्या कोपऱ्यात दुखापत झाली आहे आणि त्याच्या जागी संघात श्रेयस अय्यरचे कमबॅक झाले आहे. मोहम्मद शमीच्या जागी शार्दूल ठाकूर, तर रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलचा अंतिम ११मध्ये समावेश करण्यात आला आहे.   India XI: शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, टी नटराजन  

Australia XI: मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, मोइजेस हेन्रीक्स, डी'आर्सी शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, डॅनिएल सॅम्स, सीन अबॉट, मिचेल स्वेप्सन, अँण्ड्य्रू टाय, अॅडम झम्पा.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशार्दुल ठाकूरयुजवेंद्र चहलमोहम्मद शामी