India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक डावपेच टाकले. आर अश्विनला लगेच गोलंदाजीला पाचारण करून त्यानं यजमानांना पहिल्या सत्रात धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज अवघ्या ३८ धावांवर माघारी परतले होते. त्यात अश्विननं दोन, तर जसप्रीत बुमराहनं एक विकेट घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला हा शंभरावा कसोटी सामना आहे. अडखळत्या सुरुवातीनंतर मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड यांनी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना. मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना ऑसी फलंदाजांना कोंडीत पकडले. बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता.
बुमराह व यादव यांच्याकडून १० षटकं पूर्ण करून घेतल्यानंतर अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं स्टीव्ह स्मिथला फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण, लाबुशेन व हेड यांनी डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली.
सर्वाधिक कसोटी सामने कोणत्या देशांमध्ये
ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड - ३५१
वेस्ट इंडिज वि. इंग्लंड - १६०
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका - १५३
इंग्लंड वि. भारत - १२२
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज - ११६
इंग्लंड वि. न्यूझीलंड - १०५
भारताचे सर्वाधिक कसोटी सामने कोणत्या संघाविरुद्ध
१२२ वि. इंग्लंड
१०० वि. ऑस्ट्रेलिया
९८ वि. वेस्ट इंडिज
५९ वि. न्यूझीलंड
५९ वि. पाकिस्तान
४४ वि. श्रीलंका
Web Title: India vs Australia, 2nd Test : 100th Test match between Australia and India, Labuschagne and Head complete the 50-run stand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.