India vs Australia, 2nd Test : रवींद्र जडेजा थांब सांगत असताना शुबमन गिल कॅचसाठी धावला अन्... Video 

India vs Australia, 2nd Test : या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja)  पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना आहे आणि या सामन्यात एक प्रसंग असा घडला की जडेजा काहीसा नाराज दिसला. 

By स्वदेश घाणेकर | Published: December 26, 2020 07:22 AM2020-12-26T07:22:55+5:302020-12-26T07:24:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd Test : Almost disaster! But Ravindra Jadeja held his ground and held the catch, Video | India vs Australia, 2nd Test : रवींद्र जडेजा थांब सांगत असताना शुबमन गिल कॅचसाठी धावला अन्... Video 

India vs Australia, 2nd Test : रवींद्र जडेजा थांब सांगत असताना शुबमन गिल कॅचसाठी धावला अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देलंच टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज ६५ धावांवर माघारी आर अश्विनला दोन, तर जसप्रीत बुमराहला एक विकेट

India vs Australia, 2nd Test :  विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक रणनीती अवलंबली. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, अजिंक्य रहाणेच्या मास्टर स्ट्रोक समोर त्यांची भंबेरी उडाली आणि लंच टाईमपर्यंत त्यांचे ३ फलंदाज ६५ धावांवर माघारी परतले. आर अश्विननं ( R Ashwin) दोन, तर जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) एक विकेट घेतली. या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja)  पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना आहे आणि या सामन्यात एक प्रसंग असा घडला की जडेजा काहीसा नाराज दिसला. 

मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर अजिंक्य आक्रमक पवित्रा घेऊनच संघासोबत मैदानावर उतरला. जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना ऑसी फलंदाजांना कोंडीत पकडले. बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता. 

बुमराह व यादव यांच्याकडून १० षटकं पूर्ण करून घेतल्यानंतर अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. अश्विनच्या गोलंदाजीवर वेडनं पुढे येऊन जोरदार फटका मारला, परंतु चेंडू फार दूर जाऊ शकला नाही. हा झेल टिपण्यासाठी रवींद्र जडेजा धावला. त्याचवेळी तो इशाऱ्यानं ही कॅच मी पकडतो असे पदार्पणवीर शुबमन गिलला सांगत होता. पण, त्याचेही लक्ष चेंडूकडे असल्यानं जडेजाचा तो इशारा तो पाहू शकला नाही आणि एकमेकांची धडक झाली, परंतु जडेजानं हातात आलेला चेंडू सुटू दिला नाही. 

पाहा सुपर कॅच

त्यानंतर अश्विननं मोठा मासा गळाला लावला. स्टीव्ह स्मिथला त्यानं भोपळा फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. 

Web Title: India vs Australia, 2nd Test : Almost disaster! But Ravindra Jadeja held his ground and held the catch, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.