Join us  

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचा 'मास्टर स्ट्रोक' कामी आला; ऑस्ट्रेलियाची उडाली दैना 

India vs Australia, 2nd Test : मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: December 26, 2020 6:41 AM

Open in App

India vs Australia, 2nd Test :  विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक रणनीती अवलंबलेली पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, अजिंक्य रहाणेच्या मास्टर स्ट्रोक समोर त्यांची भंबेरी उडालेली पाहायला मिळाली. ICCTest Ranking मधील अव्वल फलंदाज स्टीव्हन स्मिथला ( Steve Smith) अजिंक्यच्या रणनीतीसमोर गुडघे टेकावे लागले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच स्मिथ भारताविरुद्ध भोपळा न फोडताच माघारी परतला. 

मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर अजिंक्य आक्रमक पवित्रा घेऊनच संघासोबत मैदानावर उतरला. जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना ऑसी फलंदाजांना कोंडीत पकडले. बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता.  बुमराह व यादव यांच्याकडून १० षटकं पूर्ण करून घेतल्यानंतर अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं मोठा मासा गळाला लावला. स्टीव्ह स्मिथला त्यानं भोपळा फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनअजिंक्य रहाणेस्टीव्हन स्मिथजसप्रित बुमराह