India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाला नेतृत्वकौशल्यानं सर्वांना चकित केलं. गोलंदाजांचा योग्य वापर अन् परफेक्ट फिल्ड प्लेसमेंट करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कोंडी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुडाळल्यानंतर टीम इंडियानं दिवसअखेर १ बाद ३६ धावा केल्या. प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीतही भारतीय गोलंदाजांनी केलेली कमाल पाहून साऱ्यांनीच कर्णधार अजिंक्यचं कौतुक केलं. पण, महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी कोणतीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
जसप्रीत बुमराह, आर अश्विन यांनी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑसींचे ३ फलंदाज ३६ धावांवर तंबूत परतले होते, परंतु मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हीस हेड यांनी ८६ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला पुन्हा ट्रॅकवर आणले. टी ब्रेकनंतर ऑसींना एकामागून एक धक्के दिले. टीम इंडियानं ऑस्ट्रेलिाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळला. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ३५ धावांत ३, तर मोहम्मद सिराजनं ४० धावांत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) अजिंक्यच्या कॅप्टनशीपबद्दल विचारले. तेव्हा गावस्कर म्हणाले,''अजिंक्यच्या कॅप्टन्सीबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, कारण मी तसं केलं, तर मी मुंबईच्या खेळाडूची पाठराखण करतो असं लोकं म्हणतील.''
Web Title: India vs Australia, 2nd Test : I won't say much about Ajinkya Rahane's captaincy, Say Sunil Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.