India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) फटकेबाजी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून टिव्हीसमोर बसलेल्यांची निराशा झाली. कॅप्टन्स इनिंग शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja)नं अर्धशतकी धावेसाठी घाई केली आणि अजिंक्यला विकेट गमवावी लागली. त्यानंतर टीम इंडियाचे तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले आणि मोठी आघाडी घेण्याचे स्वप्नही भंगले.
७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्यनं १०४ धावांवरून पुढे खेळ करताना मोठ्या खेळीची आस दाखवली. त्याच्यात तो आत्मविश्वासही दिसत होता. पण. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला माघारी जावं लागलं. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला.
अजिंक्यच्या या कृतीनं पुन्हा एकदा त्याच्यातला खरा कर्णधार अनुभवायला मिळाला. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतानं पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली.
Web Title: India vs Australia, 2nd Test : India all out for 326, lost the last 5 wickets for 32 runs but lead by 131 runs in the first innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.