Join us  

India vs Australia, 2nd Test : नेतृत्व असं करावं...; संघ संकटात असताना अजिंक्य रहाणेनं झळकावलं शतक

India vs Australia, 2nd Test :  The Indian captain leads by example, 12th Test hundred for Ajinkya Rahane

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 12:08 PM

Open in App

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane)  कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं दमदार खेळ केला. अजिंक्य रहाणेनं टीम संकटात असताना शतकी खेळी केली. कसोटीतील त्याचे हे १२ वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे दुसरे शतक आहे. 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी ऑसींनी DRS घेतला, परंतु तो अपयशी ठरला. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑसींना दिवसाचे पहिले यश मिळाले. ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुजारा १७ धावांवर बाद झाला. 

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. नॅथन लियॉननं त्यांची एकाग्रता भंग केली अन् जोरदार फटका मारण्याच्या नादात विहारी ( २१) झेलबाद झाला.  संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स यालाच लक्ष्य केले. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले. पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. २९ धावांवर तो माघारी परतला. रहाणे एका बाजूनं खिंड लढवत आहे. अजिंक्यनं १९६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणे