Join us  

Ind vs Aus 2nd test live : उस्मान ख्वाजाचे शतक हुकले; जडेजा-अश्विनने रचला इतिहास; केएल राहुलचा अप्रतिम झेल 

India vs Australia 2nd test live score updates: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 1:53 PM

Open in App

India vs Australia 2nd test live score updates । नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन व मिचेल स्टार्क आजच्या सामन्यातही खेळणार नाहीत. मॅट शेनशोच्या जागी आज ट्रेव्हिस हेडला संधी मिळाली आहे, तर बोलंडच्या जागी कुलनेमन पदार्पण करत आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. 

दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी ( Cheteshwar Pujara 100th Test) आजची कसोटी महत्त्वाची आहे. भारताकडून 100 कसोटी खेळणारा तो 13 वा खेळाडू ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने साजेशी सुरूवात केली. 47.2 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 168 एवढी झाली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (15), उस्मान ख्वाजा (81), मार्नस लाबूशेन (18), स्टीव्ह स्मिथ (0), ट्रेव्हिस हेड (12) तर पीटर हँड्सकॉम्ब 55 चेंडूत 29 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.

रवींद्र जडेजाचे 250 बळी पूर्ण भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये 250 बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर तंबूत पाठवले आणि ही किमया साधली. भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे ख्वाजाला आपल्या शतकाला मुकावे लागले. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर मोहम्मद शमी (2) आणि रवींद्र जडेजाला (1) बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे रविचंद्रन अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात 100 बळी पूर्ण केले. अशी किमया साधणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाआर अश्विनबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App