IND vs AUS 2nd test live: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात १८७७ मध्ये झाली होती. तेव्हापासून अनेक सामने झाले पण आजच्या सामन्यात असे काही पाहायला मिळाले, की जे याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीच दिसले नव्हते.
१४६ वर्षात पहिल्यांदाच घडला असा प्रकार!
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटीत केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. हा वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून कॅप्टन पॅट कमिन्स आहे. १४६ वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ फक्त एका वेगवान गोलंदाजासह सामना खेळत आहे.
--
'प्लेइंग 11'मध्ये ४ फिरकीपटू!
दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग ११ मध्ये ४ फिरकीपटूंचा समावेश केला आहे. नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून संघाचा भाग बनले आहेत. तर ट्रेव्हिस हेडही फिरकी गोलंदाजी करू शकतो. मॅथ्यू कुहनेमनचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्याला मिचेल स्वेपसनच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले आहे.
'या' गोलंदाजांना भारतीय संघात स्थान
रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा स्पिनर म्हणून टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज म्हणून संघाचा भाग बनले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ- डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनमन
भारताचा संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Web Title: India vs Australia 2nd Test Live Updates Aus playing test match with only 1 pacer first time in history of 146 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.