India vs Australia, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया पुनरागमन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार हे निश्चित आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या कसोटीतील मॅन ऑफ दी मॅच विजेत्या खेळाडूला एका विशेष पदकानं सन्मानिक करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत मॅन ऑफ दी मॅच विजेत्या खेळाडूला जॉनी मुलाघ मेडल देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील संघाचे मुलाघ हे कर्णधार होते आणि त्यांना मानवंदना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
१८६८मध्ये मुलाघ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दौरा केला होता. ''बॉक्सिंग डे कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मुलाग मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. १८६८च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील संघाचे कर्णधारपद मुलाघ यांनी भूषविले होते आणि त्यांना स्मरणार्थ हा मेडल देण्यात येणार आहे,''असे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले.