India vs Australia 2nd Test Mohammed Siraj gives fiery send off to Travis Head छ अॅडिलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 'जानी दुश्मन' ट्रॅविस हेडनं शतकी खेळीसह टीम इंडियाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. १४१ चेंडूत १४० धावांची धमाकेदार खेळी करत त्याने ऑस्ट्रेलिया संघाला अगदी मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. कसोटी सामन्यात आक्रमक अंदाजात बॅटिंग करताना त्याने मोहम्मद सिराजचाही समाचार घेतला. सिराजच्या गोलंदाजीवर त्याने एक उत्तुंग फटका मारत आपलं स्पीड आणखी वाढवण्याचे संकेत दिले. पण DSP सिराजनं याच षटकात त्याचे 'चलान' कापले.
अन् सिराजनं घेतला टॅविस हेडशी पंगा
मोहम्मद सिराजनं अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर ट्रॅविस हेडला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर या दोघांच्या स्लेजिंगचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले. विकेट गमावल्यावर ट्रॅविस हेड आपल्या स्वत:च्या शॉट सिलेक्शनवर नाखुश दिसला. एवढेच नाही तर निघ आता असं म्हणत सिराजनं आधीच्या चेंडूवर मारलेल्या सिक्सरचा राग काढत आपले तेवरही दाखवले. या सीनमुळं दोघांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोघांच्यातील सीन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
मग ऑस्ट्रेलियन चाहत्यांनीही स्टेडियममध्ये केला 'दंगा'
ट्रॅविस हेड हा आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येनं चाहते त्याची बॅटिंग पाहायला आले होते. सिराजनं स्टार बॅटरसोबत पंगा घेतल्यावर भारतीय गोलंदाजा विरुद्ध स्टेडियममध्ये बसून स्लेजिंगचा डाव खेळला. पण सिराज त्यांना पूरन उरला. षटक संपल्यावर सिराज सीमारेषे लगत क्षेत्ररक्षणासाठी गेला. त्यावेळी तो कल्ला करणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ओरडा की आता...असा इशारा करत त्यांची शाळा घेताना दिसून आले. ट्रॅविस हेड विरुद्धचं स्लेजिंग अन् त्यानंतर चाहत्यांसमोर सिराजनं दाखवलेला तोरा हा
टेस्ट मॅचमध्ये एक खास ट्विस्ट देणारा क्षण ठरला.
मोहम्मद सिराजचा 'चौकार'
मोहम्मद सिराजनं ट्रॅविस हेडसह दुसऱ्या कसोटी सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. यात अॅलेक्स कॅरी १५(३२), मिचेल स्टार्क १८ (१५), स्कॉट बोलँड ०(९) या तिघांच्या विकेट्सचा समावेश होता. हेडच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ३३७ धावा करत १५७ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.
Web Title: India vs Australia 2nd Test Mohammed Siraj gives fiery send off to Travis Head, gets booed by Adelaide crowd WATCH
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.