India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाला नेतृत्वकौशल्यानं सर्वांना चकित केलं. गोलंदाजांचा योग्य वापर करताना त्यानं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑसींचा निम्मा संघ १३६ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियानं सामन्यावरील पकड मजबूत केली. ऑसी कर्णधार टीम पेन ( Tim Paine) याला नाबाद देण्यावरून मात्र नवा वाद पेटला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न, ब्रँड हॉज यांच्यासह भारताच्या वासीम जाफर यानंही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना ऑसी फलंदाजांना कोंडीत पकडले. बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता. अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं स्टीव्ह स्मिथला फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण, लाबुशेन व हेड यांनी डाव सावरला.
खेळपट्टीचा बदललेला अंदाज पाहता कर्णधार अजिंक्यनं पुन्हा बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याचा हाही डाव यशस्वी ठरला. बुमरानं हेडला ( ३८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपटून हेड व लाबुशेन यांची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. मोहम्मद सिराजनं पदार्पणात पहिली विकेट घेतली. लाबुशेनला ४८ धावांवर त्यानं शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दोन्ही पदार्पणवीरांनी टीम इंडियाला हे यश मिळवून दिलं. सिराजच्या या विकेटनं ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३६ अशी झाली.
टी ब्रेकनंतर ऑसींना आणखी एक धक्का बसला असता. आर अश्विनच्या गोलंदाजीवर कॅमेरून ग्रीन व पेन यांनी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यष्टिरक्षक रिषभ पंत स्टम्प उडवेपर्यंत पेनची बॅट ही क्रीजच्या मागे असल्याचे दिसत होते, परंतु तिसऱ्या पंचांनी निर्णय फलंदाजाच्या बाजूनं दिला. त्यावरून वाद सुरू झाला आहे.
Web Title: India vs Australia, 2nd Test : Not out? Or did Tim Paine get lucky?; Aussie Captain survives by the skin of his teeth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.