ठळक मुद्दे चार सामन्यांच्या मालिकेच्या दुसरा कसोटीचा खेळ शुक्रवारी पर्थवर खेळला जाणारदुसऱ्या कसोटीतून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती देण्यात आलीउद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीच्या सामन्यात भारतीय संघात बदल
नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार सामन्यांच्या मालिकेच्या दुसरा कसोटीचा खेळ शुक्रवारी पर्थवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या या दुसऱ्या कसोटीतून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसवण्यात येणार असून, उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार आहे.
बीसीसीआयनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. पर्थ मालिकेसाठी बीसीसीआयनं 13 जणांच्या संघाची घोषणाही केली आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेद यादव यांच्या नावांचा समावेश आहे. सराव सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉ नसल्यानंही कोहलीसह निवड समितीच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे टीम इंडियानं मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे.
Web Title: India vs Australia 2nd Test: R Ashwin, Rohit Sharma and Prithvi Shaw ruled out with injuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.