India vs Australia, 2nd Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीसामन्यात आतापर्यंत टीम इंडिया फ्रंटफुटवर दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १९५ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं ४७ षटकांत ४ बाद १२२ धावा केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटातही भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया सर्व खबरदारीही घेत आहे. पण, या सामन्यात एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला आहे. जानेवारीत विराट-अनुष्काच्या घरी गोड बातमी येणार आहे आणि त्यावरूनच एक पोस्टर व्हायरल झालं आहे.
भारताच्या २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम पेन व रिषभ पंत यांच्यातील एक किस्सा प्रचंड चर्चीला गेला होता. ऑसी कर्णधार पेननं भारताचा यष्टिरक्षक पंतला बेबी सिटिंगची विचारणा केली होती. त्यावरून पंतनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इतकेच नव्हे तर पंतने कसोटी मालिकेनंतर पेनच्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत धम्माल मस्तीही केली. आता बेबी सीटींगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पाहा काय आहे व्हायरल पोस्टर
Web Title: India vs Australia, 2nd Test : Rishabh pant- Tim paine, virat kohli needs a babysitter; poster goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.