पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर गुंडाळल्यानंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 8 धावांवर माघारी परतले. मात्र, कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि नंतर रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा केल्या. कोहली 82 धावांवर, तर रहाणे 51 धावांवर खेळत असून भारत अद्याप 154 धावांनी पिछाडीवर आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 2nd Test: विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीने भारताला बळ!
IND vs AUS 2nd Test: विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीने भारताला बळ!
India vs Australia 2nd Test: कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:18 PM
ठळक मुद्देविराट कोहली व अजिंक्य रहाणे यांचे अर्धशतककोहली व रहाणेची चौथ्या विकेटसाठी नाबाद 90 धावांची भागीदारीकोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह 74 धावा जोडल्या