India vs Australia, 2nd Test : टीम इंडियाच्या चिंतेत भर?, विकेट घेणाऱ्या उमेश यादवनं मैदान सोडलं; पाहा काय घडलं 

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या.भारतानं ११२ षटकांत ७ बाद ३२१ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 28, 2020 08:56 AM2020-12-28T08:56:48+5:302020-12-28T08:57:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd Test : Worrying Signs For India As Umesh Yadav Leaves Field With Calf Injury, Watch Video  | India vs Australia, 2nd Test : टीम इंडियाच्या चिंतेत भर?, विकेट घेणाऱ्या उमेश यादवनं मैदान सोडलं; पाहा काय घडलं 

India vs Australia, 2nd Test : टीम इंडियाच्या चिंतेत भर?, विकेट घेणाऱ्या उमेश यादवनं मैदान सोडलं; पाहा काय घडलं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली.  तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला चौथ्या धावेवर उमेश यादवनं पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर ८व्या षटकात त्यानं दुखापतीमुळे मैदान सोडले. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. 

७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला.  १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला माघारी जावं लागलं. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला.  अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या.  यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही.  ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. मोहम्मद सिराजनं त्याचं षटक पूर्ण केलं. उमेशनं केवळ ३.३ फेकून ५ धावांत १ विकेट घेतली आहे. तो मैदानावर न आल्यास टीम इंडिया खरंच अडचणीत सापडू शकते. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्या गैरहजेरीत भारतासाठी हा मोठा धक्का बसू शकतो.  

पाहा व्हिडीओ..



 

Web Title: India vs Australia, 2nd Test : Worrying Signs For India As Umesh Yadav Leaves Field With Calf Injury, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.