भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांना अपयश आले. पण, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अॅलेक्स करीनंही स्मिथला साजेशी साथ दिली. पण, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत सुरेख गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर लगाम लावला. त्यामुळे स्मिथच्या शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला मोठा पल्ला गाठता आला नाही. शमीनं अखेरच्या दोन षटकांत ऑसींच्या फलंदाजांचे त्रिफळे उडवले. लक्ष्याचा पाठला करायला उतरलेल्या रोहित शर्मानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली. पण, मोहम्मद शमीनं चतुराईनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ( 3) यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 19 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर फिंच आणि स्टीव्ह स्मिथ डाव सावरतील असे वाटले होते, पण या जोडीला समन्वय राखता आला नाही. मोहम्मद शमीनं भारताला दुसरे यश मिळवून दिले.
नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथनं फटका मारल्यानंतर धाव घेण्यासाठी आवाज दिला. फिंचनं तोपर्यंत क्रीज सोडली होती आणि चेंडू भारतीय फलंदाजाच्या हातात असल्याचे दिसताच स्मिथ पुन्ही क्रीजवर परतला. फिंच तोपर्यंत खूप पुढे आला होता आणि त्ला धावबाद व्हावे लागले. त्यानंतर फिंच स्मिथच्या दिशेनं आरडाओरड करताना तंबूत गेला. ऑस्ट्रेलियानं 10 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या.
India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं
पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
Big Breaking : शिखर धवननं दुखापतीमुळे मैदान सोडलं, खेळण्यावर संभ्रम
India vs Australia, 3rd ODI: विराट कोहलीचा स्टनिंग कॅच, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का Video
U19WC : टीम इंडियाची यंग ब्रिगेडही सुसाट... श्रीलंकेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई